Thursday, 11 August 2016

How to Start Tuti-Fruti Making Business | कच्च्या पपई पासून टुटी- फ्रुटी बनवणे.




How to Start Tuti-Fruti Making Business.

कच्च्या पपई पासून टुटी- फ्रुटी बनवणे.





कच्च्या पपईवर प्रक्रिया करून टुटी - फ्रुटी बनवली जाते. हा एक फळप्रक्रियेवर आधारित लघु-उद्योग किंवा गृह-उद्योग होऊ शकतो. कमी गुंतवणुकीमध्ये जास्त पैसे मिळवून देणाऱ्या उद्योग प्रकारातला हा एक उद्योग आहे.


टुटी - फ्रुटी म्हणजे काय ?

कच्या पपई वर प्रक्रिया करून टुटी - फ्रुटी बनवली जाते. यामध्ये पपईच्या तुकड्यांवर साखर आणि कृत्रिम रंगाची प्रक्रिया केली जाते. प्रामुख्याने पिवळा,हिरवा,लाल हे कृत्रिम रंग वापरतात. 

टुटी - फ्रुटीचा वापर -

 टुटी  - फ्रुटी चा वापर प्रामुख्याने, मसाला पान,मुखवास, आईस्क्रीम, बेकरी उत्पादन इत्यादी मध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. 

टुटी - फ्रुटीची बाजारपेठेतील मागणी - 

याची बाजारपेठेतली मागणी खूपच मोठ्या प्रमाणावर आहे.तुम्ही जर तुमच्या एरिया मधल्या  पान शॉप चा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल कि पान शॉप मध्ये याला किती मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच आईस्क्रीम, बेकरी उत्पादन यामध्ये सुद्धा खूप मागणी आहे. ह्या गोष्टी दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या आहेत त्यामुळे भविष्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल कि टुटी  - फ्रुटी ची बाजारपेठ किती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. 

टुटी - फ्रुटी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल -

) तैवान ७८६ जातीची कच्ची पपई. 
२) साखर. 
३) कृत्रिम रंग. 
४) सायट्रिक ऍसिड. 
५) मीठ.  
६) पॅकिंग साठी प्लास्टिक पिशवी. 

यंत्र व सामुग्री -
१) पिलिंग मशीन ( साल काढणी यंत्र ). 
२) क्यूबिंग मशीन ( लहान तुकडे करणारे यंत्र ). 
३) ५० लिटर क्षमतेचा बॉयलर. 
४) केटल ( शिजवण्याचे यंत्र ). 
५) ड्रायर ( वाळवणी यंत्र ). 
६) वजनकाटा 
७) पॅकिंग मशीन. 

प्रक्रिया पद्धत -
१) टुटी -फ्रुटी तयार करण्यासाठी तैवान ७८६ या जातीची कच्ची पपई वापरतात. 
२) सालकाढणी यंत्राद्वारे पपईची साल काढून घेतली जाते. 
३) पपईचे तुकडे करून ते १८ टक्के मिठाच्या द्रावणात २१ दिवस भिजत ठेवले जातात. 
४)त्यानंतर तुकडे बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्याचे क्यूबिंग मशीन द्वारे लहान तुकडे करतात. 
५) त्यानंतर पपईचे तुकडे केटल मशीन मध्ये वाफेच्या साह्याने शिजवले जातात. 
६) शिजवून घेतलेले पपईचे तुकडे ३० टक्के साखरेच्या व ३ टक्के सायट्रिक ऍसिड च्या पाण्यात २४ तास कालावधीसाठी ठेवले जातात. 
७) पपईचे तुकडे साखरेच्या पाण्यातून बाहेर काढून पुन्हा केटल मशीन मध्ये शिजवले जातात व त्यामध्ये कृत्रिम रंगाचा वापर केला जातो. 
८) त्यानंतर ते वाळवणी यंत्राद्वारे योग्य प्रमाणात वाळवून पॅकिंग केले जातात. 

उत्तम दर्जाचं उत्पादन मिळण्यासाठी घ्यावयाची काळजी -

१) उत्पादन घेताना पिकलेली पपई व खराब पपईचा वापर करणे टाळावे. 
२) पॅकिंगच्या वेळी आद्रतेच प्रमाण ६% पेक्षा जास्त असू नये. 


यंत्र व सामुग्री खर्च - 
१) युनिट उभारण्यासाठी जागा - स्वतःची जागा असल्यास उत्तम किंवा जागेची किंमत हि प्रत्येक एरियावर अवलंबून असते. 
२) पिलिंग मशीन ( साल काढणी यंत्र ) - १,१०,००० रुपये. 
३) क्यूबिंग मशीन ( लहान तुकडे करणारे यंत्र ) - १,१०,००० रुपये. 
४) स्वयंचलित बॉयलर - २,२५,००० रुपये. 
५) केटल ( शिजवणी यंत्र ) - १,२५,००० रुपये. 
६) वाळवणी यंत्र - ६०,००० रुपये. 
७) वजनकाटा आणि पॅकिंग मशीन - २०,००० रुपये. 

एकूण यंत्र सामुग्री खर्च अंदाजे - ६,५०,००० रुपये ( अंदाजे )

टीप - राष्ट्रीय फलोउत्पादन योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योगासाठी ५० टक्के अनुदान उपलब्ध आहे. 

उत्पादन खर्च ( १०० किलो साठी ) - 
१) कच्चा पपई - ८०० रुपये. 
२) साखर ६० किलो - १८०० रुपये. 
३) कृत्रिम रंग - १५० रुपये. 
४) इंधन खर्च - ३०० रुपये. 
५) लाईट बिल व पाणी - ५० रुपये. 
६) कामगार मजुरी - ४०० रुपये. 
७) प्लास्टिक पिशवी - १०५ रुपये. 
८) इतर खर्च - १०० रुपये. 
एकूण खर्च - ३७०५ रुपये. 

नफा - 
उत्पादन खर्च प्रत्येकी १ किलो - ३७ रुपये. 
चालू बाजारभाव प्रत्येकी १ किलो - १०० रुपये. 

निव्वळ नफा प्रत्येकी १०० किलो मागे - ६३०० रुपये. 

दिवसाकाठी १०० किलो उत्पादन घेतलं तर महिन्याकाठी सर्व खर्च वगळता १,८९,००० रुपये निव्वळ नफा मिळतो . 



आपल्याला माहिती आवडली असेल तर Share On Facebook  वर क्लिक करून शेयर करायला विसरु नका. कदाचीत आपला एक शेयर एक यशस्वी मराठी उद्योजक  घडवू  शकतो,


वरील उद्योगाच्या अधिक माहिती किंवा मशीन च्या माहिती साठी माझ्या ई-मेल वर संपर्क करू शकता किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करू  शकता. 
संपर्क - Sk86708@gmail.com

















6 comments:

Unknown said...

Send contact number plz

Unknown said...

Send contact number

Unknown said...

Send contact number

Unknown said...

मी इच्छुक आहे

Unknown said...

प्रशिक्षण कुटे मिळेल

Anonymous said...

Contact number please

Subscribe