
How To Start Soap Making Business । घरी बसून साबण उद्योग सुरु करा आणि कमवा हजारो रुपये.
[ नक्की वाचा - कच्च्या पपई पासून टुटी- फ्रुटी बनवणे. ]
साबण अशी एक वस्तू आहे कि जिचा उपयोग रोजच्या जीवनात प्रत्येक माणसाकडून केला जातो. त्यामुळे साबण उद्योगामध्ये मंदी येण्याचा प्रश्नच येत नाही. आपण जर साबण उद्योग सुरु करायच्या विचारात असाल तर त्यासाठी आपणास पुरेशी माहिती आसण आवश्यक आहे. साबण उद्योग आपण घरी बसून सुद्धा सुरु करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो. त्या साठी जास्त भांडवल किंवा गुंतवणूक लागत नाही.
बाजारामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. त्यामध्ये कपडे धुण्याचा साबण, आंघोळीचा साबण, सुवासिक साबण सुद्धा आज खूप प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. यावरून आपल्या एक लक्षात येईल कि साबण बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळे केमिकल त्यासाठी वापरले जातात.
साबण रोजच्या वापरातील वस्तू असल्यामुळे साबणाची मागणी सुद्धा बाजारपेठेत खूप प्रमाणात उपलब्ध आहे. आपण आपल्या जवळच्या दुकानात जाऊन महिन्याला तो दुकानदार किती साबणाची विक्री करतो याची खात्री केली तर आपल्या नक्कीच लक्षात येईल कि साबण उद्योगामध्ये आपण उत्तम गुणवत्ता आणि दर्जा असलेले साबण बनवून महिन्याकाठी घरबसल्या किती कमाई करू शकतो.
अंगाचा हर्बल साबण बनवण्याची प्रक्रिया -
साबण हे शीत आणि उष्ण या दोन पद्धती वापरून बनवले जातात. पण शीत पद्धतीने घरच्या घरी साबण बनवणे खूप सोपे जाते. त्यामुळे शीत पद्धतीने साबण बनवण्याची प्रक्रिया इथे आपण बघणार आहोत.
साबण बनवताना घ्यावयाची काळजी -
साबण बनवताना त्यामध्ये वापरात येणारा कॉस्टिक सोडा हे मिश्रण त्वचेसाठी खूपच दाहक आहे. ते त्वचेवर पडल्यास त्याची इजा होऊ शकते याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. कॉस्टिक सोडा वापरताना त्याचा त्वचेशी संपर्क येऊ देयचा नाही. त्यासाठी रबरी हातमोजे, गाँगल, तोंडाचा मास्क वापरणे बंधनकारक आहे. कॉस्टिक सोडा मिश्रण बनवण्यासाठी वापरलेली भांडी स्वयंपाघरात वापरू नये व आपल्या घरात लहान मुले असतील तर त्यांचा ह्या भांड्याशी संपर्क येणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.
साबण बनवण्यासाठी लागणारी उपकरणे -
१) सुरक्षेसाठी - रबरी हातमोजे,गॉगल, तोंडाचा मास्क.
२) वजन काटा. ( साबण बनवण्या साठी लागणाऱ्या वस्तू मोजण्यासाठी )
३) स्टील भांड ( कॉस्टिक सोडा बनवण्यासाठी )
४) काचेचं भांड ( साबणाचे मिश्रण बनवण्यासाठी )
५) इलेक्ट्रिक ब्लेंडर ( मिश्रण घुसळण्यासाठी )
६) साबण बनवण्याचा साचा.
साबण बनवण्यासाठी लागणारी उपकरणे येथे उपलब्ध आहेत तुम्ही घरी बसून सुद्धा मागवू शकता.
१) वजन काटा. ( साबण बनवण्या साठी लागणाऱ्या वस्तू मोजण्यासाठी ) -
ऑनलाईन मागवण्यासाठी Amazon.in वर ३०० रुपये मध्ये उपलब्ध आहे.
२) साबण बनवण्याचा साचा -
ऑनलाईन मागवण्यासाठी Amazon.in वर उपलब्ध आहे.
३) इलेक्ट्रिक ब्लेंडर -
ऑनलाईन मागवण्यासाठी Amazon.in वर उपलब्ध आहे.
२) साबण बनवण्याचा साचा -
ऑनलाईन मागवण्यासाठी Amazon.in वर उपलब्ध आहे.
३) इलेक्ट्रिक ब्लेंडर -
ऑनलाईन मागवण्यासाठी Amazon.in वर उपलब्ध आहे.
साबण बनवण्याचे साहित्य -
१) पोटॅशियम हायड्राक्साइड ( कॉस्टिक सोडा ) ८० ग्रॅम.
२) ऑलिव्ह ऑइल ५०० ग्रॅम.
३) कोकोनट ऑइल १०० ग्रॅम.
४) इसेनशनल ऑइल १० ग्रॅम.
५) शुद्ध पाणी १९५ ग्रॅम
६) फुलांच्या सुकलेल्या पाकळ्या
टीप - साहित्य केमिकल दुकान, जनरल स्टोर, किंवा ऑनलाईन सुद्धा मिळू शकत.
टीप - साहित्य केमिकल दुकान, जनरल स्टोर, किंवा ऑनलाईन सुद्धा मिळू शकत.
साबण बनवण्याची कृती -
१) कॉस्टिक सोड्याचे मिश्रण बनवणे -
स्टीलच्या भांड्यामधे कॉस्टिक सोडा पाण्यात हळू हळू मिसळून घ्यावा ( सोड्यामध्ये पाणी मिसळू नये ). मिसळताना त्याचा शरीराच्या कुठल्याही भागाशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी व त्या मिश्रणाचा वास घेणे टाळावे. मिश्रण तयार होत असताना खूप जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते. मिश्रण व्यवस्तीत काठीने ढवळून घ्यावे. मिश्रण तयार झाल्यावर २४ तास थंड होण्यासाठी ठेवावे.
२) दुसऱ्या काचेच्या भांड्यात ऑलिव्ह ऑइल व कोकोनट ऑइल मिक्स करून घ्यावे.
३) नंतर कॉस्टिक सोड्याचे मिश्रण थंड झाल्याची खात्री करून घ्यावी व ते मिश्रण काठीने हळू हळू काठीने ढवळत ऑइल मध्ये मिक्स करावे.
४) नंतर ते मिश्रण इलेक्ट्रिक ब्लेंडर च्या साह्याने अंगावर किंवा आजूबाजूला पडणार नाही ह्याची काळजी घेऊन जाडसर होईपर्यंत मिक्स करावे.
५) मिश्रण घट्ट होण्याची प्रक्रिया सुरु होईल म्हणजेच त्याच साबणात रूपांतर होईल.
६) नंतर त्या मिश्रणात इसेनशनल ऑइल व आवडीनुसार सुवासिक फुलांच्या सुक्या पाकळ्या मिसळवून घ्यावा.
७) आता हे मिश्रण साबण बनवण्याच्या साच्या मध्ये ओतावे. मिश्रण ओतायचा आधी साचा ला तेल लावल्यास साबण चिकटण्याची शक्यता खूप कमी असते.
८) सुकण्यासाठी २४ तास ठेवून द्यावे व नंतर साचा मधून साबण बाहेर काढून पॅकिंग करून विक्री साठी तयार होतील.
आपल्याला माहिती आवडली असेल तर Share On Facebook वर क्लिक करून शेयर करायला विसरु नका. कदाचीत आपला एक शेयर एक यशस्वी मराठी उद्योजक घडवू शकतो,
[ नक्की वाचा - बटाटा वेफर्स उद्योग माहिती ]
वरील उद्योगाच्या अधिक माहिती किंवा मशीन च्या माहिती साठी माझ्या ई-मेल वर संपर्क करू शकता किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करू शकता.
संपर्क - Sk86708@gmail.com
No comments:
Post a Comment