How TO Start A Potato Chips Making Business. बटाटा वेफर्स उद्योग.
[ नक्की वाचा - साबण उद्योग व्यवसाय माहिती ]
कच्च्या बटाटयावर प्रक्रिया करून त्यापासून वेफर्स, फ्रेंच फ्राईज, चिवडा हे उत्पादन घेता येऊ शकते. हा एक फळप्रक्रियेवर आधारित लघु-उद्योग किंवा गृह-उद्योग होऊ शकतो. कमी गुंतवणुकीमध्ये जास्त पैसे मिळवून देणाऱ्या उद्योग प्रकारातला हा एक उद्योग आहे.
आज खाद्यपदार्थाच्या कुठल्याही उद्योगाला भारतामध्ये तरी मंदी नाही. बटाटा वेफर्स ला किराणा दुकान, बेकरी, हॉटेल मधून खूप मागणी असते. यामध्ये आपण साधे वेफर्स किंवा विविध मसालायुक्त वेफर्स पण बनवू शकतो. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे ते पॅकिंग करून आपण विक्री साठी उपलब्ध करू शकतो.
बटाटा वेफर्स सुरु करण्यासाठी लागणार मनुष्यबळ -
हा उद्योग चालू करण्यासाठी कमीत कमी मनुष्यबळची आवश्यक्यता असते.
उद्योगासाठी लागणारी जागा -
या उद्योगासाठी कमीत कमी ५०० स्केवर फूट व जास्तीत जास्त १००० स्केवर फूट जागेची आवश्यक्यता असते.
उद्योग सुरु करण्यासाठी लागणारा कच्चा माल -
१) बटाटे ( शर्करेचे प्रमाण कमी असलेला )
२) तळण्यासाठी तेल
३) मीठ
४) फ्लेवर ( जर मसाला युक्त वेफर्स बनवायचे असतील तर )
५) पाणी.
६) वेफर्स पॅकिंग साठी प्लास्टिक पिशव्या
वेफर्स तयार करण्याची पध्दत -
१) सर्व प्रथम बटाटे स्वछ धुवून घ्यावेत.
२) पिलर मशीन च्या साहाय्याने बटाटयाची साल काढून घेतली जातात.
३) साल काढून घेतलेले बटाटे स्लाईसिंग मशीन द्वारे योग्य त्या आकाराच्या साईझ मध्ये कापले जातात.
४) या स्लाईझ कोमट पाण्यात काही वेळ ठेवल्या जातात.
५) नंतर पाण्यातून काढलेल्या स्लाईझ ह्या उत्तम गुणवत्ता मिळण्यासाठी ड्रायर मशीन मध्ये घालून बटाट्यामधील नको असलेले पाणी शोषून घेण्यासाठी काही वेळ ठेवल्या जातात.
६) नंतर तळणी यंत्रा मध्ये तळून घेतले जातात. तळणी यंत्राचे खूप प्रकार उपलब्ध आहेत त्यामुळे प्रत्येक यंत्राच्या योग्यतेनुसार तळण्याचा वेळ व तापमान ठरवले जाते.
७) तळून घेतलेले वेफर्स मधील जास्तीचा तेल शोषून घेता येऊ शकते त्यासाठी लागणारी यंत्र सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.
८) तळलेले वेफर्स रोटर च्या साह्याने मसाला युक्त बनवण्यासाठी काही वेळ फिरत्या ड्रम मध्ये ठेवले जातात.
९) नंतर ह्या वेफर्स चा टिकावूपणा वाढवण्यासाठी ते नायट्रोजन युक्त हवा भरून पॅकिंग करून विक्री साठी बाजारपेठेत मागणी नुसार पाठवले जातात.
वेफर्स तयार करण्यासाठी लागणारी मशीन -
१) बटाटे धुण्यासाठी ड्रम किंवा ट्रे
२) पीलिंग मशीन ( साल काढण्यासाठी )
३) स्लाईझिंग मशीन ( बटाट्याचे काप करण्यासाठी )
४) ड्रायर मशीन ( बटाट्यामधील जास्तीचे पाणी शोषून घेण्यासाठी )
५) तळणी
६) रोटर ड्रम ( फ्लेवर मिक्स करण्यासाठी )
७) नायट्रोजन हवा मशीन व पॅकिंग मशीन
उद्योगासाठी लागणाऱ्या मशीनची किंमत -
या उद्योगासाठी वेगवेगळ्या क्षमता असणाऱ्या मशीन उपलब्ध आहेत व त्यांची किंमत हि त्यांच्या वर्गीकरणानुसार ठरते. आपल्या माहिती साठी म्हणून मी तासाला ५० किलो वेफर्स बनवण्याची क्षमता असलेल्या मशीन च्या किंमती खाली नमूद करत आहे.
१) पीलिंग मशीन - ४५,००० रुपये
२) स्लाईझिंग मशीन - ४५,००० रुपये
३) ड्रायर ( आद्रता शोषक ) - २५,००० रुपये
४) तळणी यंत्र - ५०,००० रुपये
५) रोटर ड्रम - ५०,००० रुपये
उत्तम गुणवत्ता राखण्यासाठी -
१) बटाटे चांगले आहेत याची खात्री करून घ्यावी खराब बटाटे बाजूला काढून टाकावेत.
२) तळणी यंत्राचे तापमान व कालावधी यंत्र बनवलेल्या कंपनीच्या शिफारसी नुसार ठेवावा.
३) पॅकिंग करताना प्लस्टिक पिशवी मध्ये नायट्रोजन हवेचे प्रमाण योग्य ठेवावे.
आपल्याला माहिती आवडली असेल तर Share On Facebook वर क्लिक करून शेयर करायला विसरु नका. कदाचीत आपला एक शेयर एक यशस्वी मराठी उद्योजक घडवू शकतो,
[ नक्की वाचा - पपई पासून टुटी - फ्रुटी बनवणे व्यवसाय माहिती ]
[ नक्की वाचा - पपई पासून टुटी - फ्रुटी बनवणे व्यवसाय माहिती ]
वरील उद्योगाच्या अधिक माहिती किंवा मशीन च्या माहिती साठी माझ्या ई-मेल वर संपर्क करू शकता किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करू शकता.
संपर्क - Sk86708@gmail.com
4 comments:
प्रशिक्षण कुटे मिळेल
Wepars Peking plant hame sikhana hai kaise banate hai
Tumcha prashikshan kuthae milel
Nice information for chips 👌
Post a Comment